You are currently viewing अवैध दारू, मटका, ड्रग्स, गुटखा धंद्यात राजकीय नेत्यांनाही हफ्ता…

अवैध दारू, मटका, ड्रग्स, गुटखा धंद्यात राजकीय नेत्यांनाही हफ्ता…

खाकीबरोबर सफेद कपडेवाले सुद्धा बरबटले…

संपादकीय……

सिंधुदुर्गात अवैध दारू आणि मटका व्यवसाय अगदी राजरोसपणे सुरू आहे. गुटखा बंदी असूनही सर्रास टपरीवर सुद्धा गुटखा दिवसाढवळ्या विकला जात आहे. त्यालाच गेल्या काही वर्षात अजून एका अनैतिक व्यवसायाची जोड मिळाली तो म्हणजे ड्रग्स…!
गोव्यातील दारू सावंतवाडीत आणायची आणि दुसऱ्या बाटल्यांमध्ये भरून त्यावर महाराष्ट्राची लेबल लावून ती परमिटरूम अगदी बिनधास्तपणे विकायची हा भेसळयुक्त दारूचा धंदा तर गेली कित्येकवर्षे सावंतवाडीत गोंधळ घालतो आहे असा भेसळयुक्त दारूचा धंदा करत असल्याची माहिती पोलिसांना असूनही परमिट रूमवर छापा टाकण्याचा अधिकार जिल्हा पोलिस प्रमुखांनाही नसल्याने बिनदिक्कत पणे दारूची भेसळ करून गोंधळ घालणारे परमिट रूम मधून दारू विकत आहेत व दारू पिणाऱ्या ग्राहकांकडून भेसळयुक्त दारूचे भरमसाठ पैसे घेऊन मौजमजा करत आहेत. पोलीस त्यांच्यावर छापा मारू शकत नाहीत परंतु तो अधिकार असणारे एक्साइज डिपार्टमेंट वाले तर स्वतःच अशा भेसळयुक्त दारू विकाणार्यांना मिळालेले असल्याने, आपली महिन्याकाठी येणारी बिदागी मिळत असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत. त्यामुळे भेसळयुक्त दारू विकणाऱ्या परमिट रूम वाल्यांना कोणाचीही भीती राहिलेली नाही.
अवैद्य धंदे करणारे आतापर्यंत खाकीला हाताशी धरून दारू, मटका, गुटखा, ड्रग्स असे अनैतिक धंदे करत होते. परंतु त्यानंतर त्यांनी काही पत्रकारांना सुद्धा हफ्ता सुरू केल्यामुळे या अवैध धंद्यांच्या विरोधात आवाज उठत नाही. त्यावर कहर म्हणजे गोव्यात झालेल्या मिटिंगमध्ये विरोधी पक्षाच्या काही राजकीय नेत्यांना सुद्धा या अवैध व्यवसायात हफ्ता सुरू करून त्यांचीही तोंडे बंद करण्याचा नवा पायंडा घातला गेला आहे. अवैध धंद्यातील हफत्यात राजकीय पुढारी वाटेकरी झाल्याने सावंतवाडीतील नवी पिढी सुद्धा बरबादीच्या वाटेवर जायला वेळ लागणार नाही.
अवैद्य धंदे करणारे लोक जेव्हा राजकीय पक्षांमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत होतात तेव्हा ते राजकीय पक्ष अवैद्य धंद्यांची पाठराखण करणार हे निश्चित होतं. त्यामुळे अनैतिक धंद्यासाठी सरकारी यंत्रणेला हफ्ता दिल्यावर सरकारी यंत्रणा आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून सामाजिक हक्क व उपस्थित केलेले सामाजिक प्रश्न दडपून टाकून अनैतिक अवैध धंद्यांना खुलेआम पाठिंबा देतात. त्यामुळे जिल्ह्यात दारू, मटका, गुटखा याबरोबरच खाकीला, काही पत्रकार व काही राजकीय नेत्यांना हाताशी धरून जिल्ह्यात ड्रग्स सुद्धा विकण्याची योजना आखली जात आहे. गुटख्या बरोबरच ड्रग्स सुद्धा परप्रांतीय व्यापाऱ्यांनी विकण्यास सुरुवात केल्याची माहिती उघड होत आहे.
आपली नवी पिढी अशा अवैद्य दारू, गुटखा, मटका, ड्रग्स मध्ये बरबाद होऊ नये अशी जर इच्छा असेल तर जिल्ह्यातील जनतेने रस्त्यावर उतरून राजकीय नेते, लोकप्रतिनिधींना जागे केले पाहिजे, अन्यथा जेव्हा आपल्याला जाग येईल तेव्हा हफ्ते घेणारे अधिकारी बदली होऊन गेलेले असतील, हफ्ते घेणारे राजकारणी गडगंज झालेले असतील आणि आपली तरुण पिढी बरबाद झालेली असेल.

क्रमशः

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × one =