काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे वाढदिवस अभिष्टचिंतन..

काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे वाढदिवस अभिष्टचिंतन..

बाळा गावडे यांची सुविद्य पत्नी ऍड.सौ.निलिमाताई यांचाही आजच वाढदिवस.

संपादकीय…..

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांचा आज वाढदिवस. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून इन्सुली सारख्या छोट्याशा गावातून येत पंचायत समिती सभापती, जि. प. आरोग्य आणि बांधकाम समिती सभापती पद भूषवित जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदावर विराजमान असलेले बाळा गावडे हे एक सर्वसामान्य कुटुंबातील असामान्य नेतृत्व. आपल्या कुशल नेतृत्वाने त्यांनी जिल्ह्यात विस्कटलेली काँग्रेसची घडी व्यवस्थित बसवत पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम केले आहे. वरिष्ठ पातळीवरून मिळणाऱ्या पाठिंब्याच्या जोरावर त्यांनी जिल्ह्यात युवकांची फळी मजबूत करत काँग्रेस पक्षाची तळागाळातून बांधणी करण्यास सुरुवात केली.
तरुण नेते असलेले बाळा गावडे यांनाही पक्षांर्गत विरोध झाला होता, परंतु नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले बाळा गावडे हे देखील मुत्सद्दी राजकारणी. वरिष्ठांची मर्जी संपादन करत विरोध मोडून काढून त्यांची पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला. त्यामुळेच वरिष्ठांनी विश्वास दाखवत संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिली. आपल्या कामाशी एकनिष्ठ राहत बाळा गावडे यांनी जिल्ह्यात पक्षाची घडी बसविण्यात ते यशस्वी ठरले. प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी देखील त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे, त्यामुळे भविष्यात काँग्रेस पक्षाच्या बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात नक्कीच बरे दिवस येतील यात शंकाच नाही.
चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांचा आज वाढदिवस. त्याच बरोबर त्यांची सुविद्य पत्नी वकील सौ निलिमा गावडे यांचा देखील आज वाढदिवस. श्री. बाळा गावडे आणि सौ निलिमा गावडे दाम्पत्यास वाढदिवसानिमित्त संवाद मीडियाकडून वाढदिवस अभिष्टचिंतन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा

प्रतिक्रिया व्यक्त करा