You are currently viewing जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री मा. नारायण राणे यांच्या झंझावती दौऱ्याच्या नियोजनासाठी भाजपा सिंधुदुर्गची बैठक संपन्न…

जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री मा. नारायण राणे यांच्या झंझावती दौऱ्याच्या नियोजनासाठी भाजपा सिंधुदुर्गची बैठक संपन्न…

कणकवली

 

केंद्रीय मंत्री झाल्यानंतर मान. नारायण राणे साहेब 25 ऑगस्ट पासून ‘जन आशीर्वाद यात्रेच्या’ माध्यमातून प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याच्या प्राथमिक नियोजनासाठी सिंधुदुर्ग भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम,जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत सर्व मंडल अध्यक्ष, सभापती यांच्या उपस्थितीत आज कणकवली येथील भाजपा कार्यालयात बैठक पार पडली..

मनपाचे नगरसेवक ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा प्रवास केलेले कोकणचे ढाण्या वाघ, सिंधुदुर्गचा बुलंद आवाज असणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा ‘जन आशीर्वाद यात्रेच्या’ माध्यमातून मुंबई- कोकणासह सिंधुदुर्ग दौरा नियोजित झाला आहे.  केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे प्रथमच सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. ‘जन आशीर्वाद यात्रेच्या’ माध्यमातून त्यांचा हा दौरा मुंबई पासून सुरू होऊन दिनांक 25 ऑगस्ट रोजी त्यांच सिंधुदुर्गत आगमन होणार आहे.

या महाराष्ट्र यात्रेचे संयोजक म्हणून आम. संजय केळकर काम पाहणार आहेत. तर मुंबई ते सिंधुदुर्ग यात्रा प्रमुख म्हणून भाजपाचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार काम पाहतील. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची यात्रा प्रमुख म्हणून जबाबदारी जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम,अशोक सावंत पाहणार आहेत.

जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून नारायण राणे हे कार्यकर्ते व जनतेच्या गाठीभेटी घेत 25 ऑगस्ट रोजी दुपारी 3.00 वाजता खारेपाटण येथे त्यांचे जंगी स्वागत होणार आहे. त्यानंतर तरळा-वैभववाडी-फोंडा आणि कणकवली येथे संध्याकाळी 6:15 वाजता आगमन आणि स्वागत होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता कणकवली येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना करून नांदगाव-शिरगाव-देवगड-कुणकेश्वर-आचरा-मालवण-चौके-कट्टा-ओरोस-कुडाळ-कोलगाव-सावंतवाडी-तळवडे-मठ आणि वेंगुर्ला येथे समारोप होईल. असे नियोजन करण्यात आले..
कॕबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर सन्मानीय नारायन राणे साहेबांचा हा पहिलाच सिंधुदुर्ग दौरा असल्याने भाजपाचे सर्वच स्तरातील कार्यकर्ते  त्यांच्या भेटीसाठी उत्सुक आहेत.

या संपूर्ण दौऱ्यात भाजपाचे विविध स्तरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेच्या गाठीभेटी केंद्रीय मंत्री नारायण राणे घेणार आहेत. आता या दौऱ्याकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे…

प्रतिक्रिया व्यक्त करा