You are currently viewing फोंडाघाटचे ज्येष्ठ व्यापारी, श्रीराधाकृष्ण मंदिर आणि वैश्य समाजाचे आधारस्तंभ – अनंत दत्तात्रय कोरगावकर यांचे दुःखद निधन

फोंडाघाटचे ज्येष्ठ व्यापारी, श्रीराधाकृष्ण मंदिर आणि वैश्य समाजाचे आधारस्तंभ – अनंत दत्तात्रय कोरगावकर यांचे दुःखद निधन

फोंडाघाट

श्री देव राधाकृष्ण मंदीर वैश्य समाज फोंडाघाटचे आधारस्तंभ आणि बाजारपेठेतील ज्येष्ठ व्यापारी अनंत दत्तात्रेय कोरगावकर तथा आण्णा यांचे वृद्धापकाळातील अल्पशा आजाराने आज सकाळी दुःखद निधन झाले. जुन्या जाणत्या व्यापाऱ्यांमध्ये त्यांच्या समंजस आणि परोपकारी व धार्मिक स्वभावामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेडोपाड्यांवरील दुकानदारांमध्ये त्यांच्या व्यवहाराबद्दल आदर होता. ते अजातशत्रु आणि सहीष्णु होते.फोंडाघाटच्या उत्थापनात प्रत्येक क्षेत्रात लांब राहून त्यांचा वावर मार्गदर्शक, दोन पिढ्यांना एकत्र आणून विकासकामे होण्याकडे, खरेपणाने होता. फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी, वैश्य समाज पतसंस्था, फोंडाघाट व्यापारी संघ यांच्या स्थापनेपासून आजवरच्या घोडदौडीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते.

श्री देव राधाकृष्ण मंदिरातील त्यांची उपस्थिती अबालवृद्धांना मार्गदर्शक आणि ऊर्जा देणारी होती. त्यामुळे मंदिराच्या व्यवस्थापनात त्यांचे अस्तित्व एकखांबी होते. त्यांच्या जाण्याने परिसरात विशेषतः व्यापारी वर्गात मोठी पोकळी निर्माण झाली असून पंचक्रोशीत त्यांच्या आठवणींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे……

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 17 =