You are currently viewing कनेडी हायस्कूलच्या विद्यार्थिनींना ब्रेन डेवलपमेंट परीक्षेत सुवर्णपदक

कनेडी हायस्कूलच्या विद्यार्थिनींना ब्रेन डेवलपमेंट परीक्षेत सुवर्णपदक

गोरे एज्युकेशनल फाऊंडेशन कोल्हापुर संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षा २०२१ मध्ये कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेच्या २ विद्यार्थ्यांनीनी सुवर्णपदक प्राप्त करत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षी ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात आली होती. परीक्षेत कनेडी हायस्कूलच्या इयत्ता सहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या तनुश्री प्रसाद मसुरकर हिने १०० पैकी ९३ गुण मिळवत सलग दुसऱ्या वर्षी सुवर्णपदक मिळवले. तसेच प्रशालेत सातवीत शिकत असलेल्या मैत्रेयी मकरंद आपटे या विद्यार्थिनीने १०० पैकी ८६ गुण प्राप्त करत या परीक्षेत प्रथमच सुवर्णपदकाची कमाई केली. दोन्ही विद्यार्थिनींचे कानेरिवडी प्रशिक्षण शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे अध्यक्ष सतीश सावंत सर्व पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन एल. डी सावंत, मुख्याध्यापक सुमन दळवी यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − sixteen =