You are currently viewing मुंबई आता १० वाजेपर्यंत सुरू

मुंबई आता १० वाजेपर्यंत सुरू

मुंबई :

मुंबईतील दुकाने, कार्यालये आठवड्यातील सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत; तर उपाहारगृहे, हॉटेल संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी आज महापालिकेने दिली आहे. आज मंगळवारपासून ही नियमावली लागू होणार आहे. कोविड निर्बंधांबाबत सोमवारी राज्य सरकारने सुधारित नियमावली जाहीर केली. त्या आधारे महापालिकेनेही दिलासा देत दुकाने, आस्थापने आता रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.

आतापर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने आठवड्यातील पाच दिवस संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी होती. शनिवार, रविवार फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याची परवानगी होती. आता हॉटेल, उपाहारगृहेदेखील आठवड्याचे सातही दिवस संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. जलतरण तसेच इतर निकटचे संपर्क असलेले खेळ वगळता इतर क्रीडा प्रकारांनाही सातही दिवस परवानगी देण्यात आली आहे. तसेच चित्रीकरणही निर्धारित वेळेत करण्याची परवानगी आहे. मुंबईतील गेल्या दोन आठवड्यातील कोविडवाढीचा सरासरी दर १.७२ टक्क्यांपर्यंत कमी आला आहे. त्यामुळे महापालिकेने निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा