You are currently viewing वैभववाडी – सोनाळीत महिलेचा झालेल्या निर्घृण खून प्रकरणी संशयित आरोपीला अटक

वैभववाडी – सोनाळीत महिलेचा झालेल्या निर्घृण खून प्रकरणी संशयित आरोपीला अटक

वैभववाडी – सोनाळीत महिलेचा झालेल्या निर्घृण खून प्रकरणी संशयित आरोपीला अटक

वैभववाडी

वैभववाडी तालुक्यातील सोनाळी – वाणीवाडी येथील ६८ वर्षीय जयश्री रामदास साटम या वयोवृद्ध महिलेचा मंगळवारी रात्री ८ च्या दरम्यान निर्घृण हत्या करण्यात आली . या खून प्रकरणात संशयित आरोपी सचिन निखार्गे याला अटक करण्यात आली. आरोपी सचिन सुरेश निखार्गे (४०) याच्यावर पोलिसांनी आज गुन्हा दाखल करून अटक केली आहे. रात्री उशिराने मायलो या श्वान पथकाने जयश्री यांच्या घरापासून त्याच्या घरापर्यंत दिशा दाखविल्याने तसेच अन्य काही पुरावे पोलिसांच्या हाती लागल्यामुळे सचिन निखार्गे यानेच खून केला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. परंतू त्याने हा खून कशासाठी केला? का केला? याबाबत आरोपीने कोणतेही जबाब दिले नसल्यामुळे पोलीस तपासात पुढे उघड होणार आहे. सचिन निखारगे याच्यावर भादवी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. आज त्याला कणकवली न्यायालयात हजर केले जाणार आहे.पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरु आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा