You are currently viewing मराठा आरक्षण मागणीसाठी शिरोडा येथे मराठा बांधव एकवटले

मराठा आरक्षण मागणीसाठी शिरोडा येथे मराठा बांधव एकवटले

मराठा आरक्षण मागणीसाठी शिरोडा येथे मराठा बांधव एकवटले

एक दिवसीय लक्षणीय साखळी उपोषणास प्रारंभ..

वेंगुर्ले

मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे…एक मराठा लाख मराठा..अशा घोषणा देत मराठा आरक्षण या मागणीसाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय महासंघ मराठा समाज शिरोडा यांच्या वतीने आज शिरोडा ग्रामपंचायत समोर एक दिवसीय लक्षणीय साखळी उपोषणास मराठा बांधवांनी सुरुवात केली आहे.

अखिल भारतीय मराठा समाज वेंगुर्ला तालुका अध्यक्ष श्री सिद्धेश परब यांच्या सह या उपोषणामध्ये शिरोडा अध्यक्ष श्री राहुल गावडे, शिरोडा सचिव श्री विशाल गावडे, शिरोडा उपसरपंच श्री चंदन हाडकी, ग्रामपंचायत सदस्य श्री प्रथमेश उर्फ बंड्या परब तसेच श्री आनंद मसुरकर, श्री बाबल गावडे, श्री रोशन परब, श्री अमोल परब, श्री पुंडलिक उर्फ भाऊ परब, श्री संदीप गावडे, श्री शैलेंद्र गावडे, श्री अशोक गावडे, श्री संदीप परब, श्री किरण राऊत यांच्यासह मराठा समाज बांधव सहभागी झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा