You are currently viewing वेंगुर्ल्यात उद्या पालकमंत्री चव्हाण यांचे होणार स्वागत..

वेंगुर्ल्यात उद्या पालकमंत्री चव्हाण यांचे होणार स्वागत..

वेंगुर्ला

महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री झाल्यावर प्रथमच वेंगुर्ले तालुक्यात ६ मे रोजी दुपारी ३ वाजता वेंगुर्ले नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात येणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते राज्यात शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल वेंगुर्ले नगरपरिषदेच्या प्रशासनाचा व लोकप्रतिनिधींचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे भाजपच्या वतीने स्वागत करण्यासाठी च्या नियोजनाची सभा तालुका कार्यालयात जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा चिटणीस नीलेश सामंत, साईप्रसाद नाईक, बाळा सावंत, तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर, बाबली वायंगणकर, महिला अध्यक्षा स्मिता दामले, युवा मोर्चाचे प्रसाद पाटकर, सारिका काळसेकर, विजय बागकर, महादेव नाईक, सुधीर गावडे, बाळू प्रभू पाकरवाडी सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील, रमेश नार्वेकर, माजी सरपंच विजय रेडकर, रवींद्र शिरसाट शेखर काणेकर उदय गावडे श्रीधर गोरे देवेंद्र वस्त वृंदा मोडेकर रसिका मटकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा