You are currently viewing कुडासे, भरपाल पुरग्रस्ताना अन्नधान्य वाटप

कुडासे, भरपाल पुरग्रस्ताना अन्नधान्य वाटप

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा पुढाकार

दोडामार्ग

मागील आठवड्यात कोंकणात मोठी पर्जन्यवृष्टी झाली आणि सर्व ठिकाणी पूर आला तसाच तो सिंधुदुर्ग मधील दोडामार्ग तालुक्यात तिराळी नदीलाही आला नदीकाठच्या बऱ्याच गावना फटका बसला घरादारात पाणी घुसल्याने सर्व होत्याचे नव्हते झाले पाण्यात सर्व नष्ट झाले बऱ्याच आतील गावात अजून मदत पोहचली नाही ह्याचा विचार करून कोंकण विभागातील नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या दोडामार्ग तालुका प्रमुख आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख तुषार देसाई व संजना देसाई यांच्या नेतृवाखाली अन्य पदाधिकारी यांच्या सहकार्याने मदत पोहचवण्याचे निश्चित केले त्याप्रमाणे पुरग्रस्ताना आवश्यक अन्नधान्य सामान खरेदी करून सर्वानी जिथे अद्याप मदत गेली नाही अशा कुडासे, भरपाल गावी जाऊन मदतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना त्यांच्या घरी जाऊन मदत त्यांच्या हाती दिली.

त्यावेळी तिथे दोडामार्ग तालुका उपाध्यक्ष राजाराम फर्जद, सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षा पूजा गावडे हे पदाधिकारी उपस्थित होते. ह्या सामाजिक कार्यात कोंकण विभागातील जिल्ह्याने सढळ हाताने मदत केली  ह्या मदतीबद्दल नेफडो राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस, राज्य अध्यक्ष दीपक भवर, कोंकण अध्यक्ष प्रकाश कदम यांनी सर्व पदाधिकारी यांचे कौतुक केले आहे. या  मदत कार्यात डॉ. वंदना पोटे, आसिया रिजवी, ऋतुजा गवस, बापू परब आणि अन्य सदस्य, पदाधिकारी यांनी नियोजना साठी मदत केली.  तर संजय सावंत, संजय नाटेकर, गौरेश राणे, अनुराग सिनारी यांनी मदत गावापर्यंत पोहचवण्याकरिता मदत केली ह्या सामाजिक बांधीलकी साठी नेफडो संस्थेचे कुडासे, भरपाल ग्रामस्थानी आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 2 =