You are currently viewing रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची संकल्पना – भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत

रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची संकल्पना – भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत

सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक कामाचा झाला शुभारंभ

ओरोस 

जिल्ह्यात रेल्वे सुरू होवून ३० वर्षे झाली आहे. ही चांगली सुविधा निर्माण झाली आहे. परंतु या ३० वर्षात केवळ ट्रेन वाढल्या आहेत. परंतु आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. ही उणीव पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी कोकण रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून रेल्वे स्थानकांचा विकास करण्याची संकल्पना मांडली. आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या स्थानकांचा विकास करण्यासाठी १०० कोटी रुपये निधी उपलब्ध केला. त्याच निधीतून ५ कोटी रुपये खर्च करीत सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकाचा विकास साधला जात आहे, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक सुशोभीकरण प्रसंगी बोलताना केले.

राज्य शासनाने राज्यातील ४२ रेल्वे स्थानकाचा विकास करण्यासाठी १०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. यातील बारा कामांचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने झाला. सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक सुशोभीकरण व रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याहस्ते झाला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, परिविक्षाधीन आयएएस अधिकारी विशाल खत्री, ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, महिला तालुकाध्यक्ष सुप्रिया वालावलकर, अजिंक्य पाताडे, देवेन सामंत, ओरोस बुद्रुक सरपंच आशा मुरमुरे, उपसरपंच गौरव घाडी, रानबांबुळी सरपंच परशुराम परब, उपसरपंच सुभाष बांबुळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर, सार्वजनिक बांधकाम कनिष्ठ अभियंता शुभम घुर्यें, नवीन बांदेकर, लॉरेन्स मान्येकर, छोटू पारकर, राजश्री नाईक, भक्ती वालावलकर, अंजली कदम, रिया कदम, साक्षी कोचरेकर, नेहा सामंत, सत्यवान चव्हाण, बापू पाताडे, विवेक बालम, गोपाळ हरमलकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − fourteen =