You are currently viewing “बँको ब्यू रिबन पुरस्कार २०२३” सिंधुदुर्ग सहकारी बँक मुंबईला प्रदान..

“बँको ब्यू रिबन पुरस्कार २०२३” सिंधुदुर्ग सहकारी बँक मुंबईला प्रदान..

संचालक डॉ. श्रीकृष्ण परब यांनी दमण येथे स्वीकारला पुरस्कार

 

सिंधुदुर्ग :

अविज पब्लिकेशन, कोल्हापूर या संस्थेमार्फत प्रतिवर्षी सहकार क्षेत्रात देशपातळीवर कार्यरत व उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना सदर पुरस्कार दिले जातात. देशातील सात राज्यांमधून सहकारी बँकांच्या गटातून सिंधुदुर्ग सहकारी बँक मुंबईला “बँको ब्यू रिबन पुरस्कार २०२३” जाहीर करण्यात आला.

सिंधुदुर्ग सहकारी बँक लिमिटेड मुंबईला आणखी एका मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे. देशभरातील १५०० हुन अधिक सहकारी बँकांमधून ग्राहकांची विश्वासार्हता जपत सहकारी बँका गटात सभासद ठेवी गोळा करण्यामध्ये गुणवत्तापूर्वक काम केल्या बद्दल या बँकेला ‘बँको ब्लु रिबन’ पुरस्कार २०२३ ने सन्मानित करण्यात आले. रिझर्व बँकेचे माजी महाप्रबंधक पी. के. अरोरा यांच्या हस्ते यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करणाऱ्या सिंधुदुर्ग सहकारी बँकेचे संचालक व मसुरे गावचे सुपुत्र डॉ. श्रीकृष्ण द. परब यांनी दमण येथे सदर पुरस्कार स्वीकारला.

देशभरातील अग्रगण्य अश्या ९० हुन अधिक सहकारी/अर्बन बँकांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी पाच सत्रांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले. बँकेचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, ग्राहकांमुळेच हे यश साध्य झाल्याची प्रतिक्रिया डॉ श्रीकृष्ण द. परब यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा