You are currently viewing शिक्षक समिती सावंतवाडीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

शिक्षक समिती सावंतवाडीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

बांदा
रक्त तयार करण्याचा ना कोणता कारखाना असतो ना कोणती प्रयोगशाळा, प्राण्यांचे रक्त ही माणसाला देऊ शकत नाही. रक्त तयार होण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे मानवी शरीर…. हे रक्त आपल्या शरीरात तयार होते पण सत्कार्यासाठी शक्तीची नव्हे तर माणुसकीची गरज असते. हीच माणुसकी दाखवत शिक्षक समिती शाखा सावंतवाडीच्या शिलेदारांनी कोरोनाच्या बिकट परिस्थितीत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी दाखवून दिली.
शिक्षक समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अंकांनी सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले. सदर शिबिरास प्राथमिक शिक्षक राजेभाऊ कांगणे, विश्राम ठाकर, नारायण नाईक, सतीश राऊळ, तुषार आरोसकर, प्रवीण शेर्लेकर, शाम देशमुख, अमोल कोळी, बापूसाहेब पोटे, प्रवीण कुडतरकर, प्रकाश आव्हाड, समीर जाधव,रमेश पवार, शसागर पाटील, अपय्या हिरेमठ, राजकुमार टिपराळे,हेमंत सावंत, सागर पाटील, रंगनाथ परब, सुनिल जाधव, प्रियदर्शनी जाधव, अरविंद कुडतरकर, अतुल खेडकर, मळेवाड हायस्कूलचे साळसकर सर आदि उपस्थित होते
संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पंचक्रोशीतील व पंचक्रोशीबाहेरील युवा मंडळांनी प्रतिसाद दिला. चराठ्याच्या सातेरी मित्रमंडळातील श्री.श्रीधर बोंद्रे, श्री, रोहित कुबल, श्री.शुभम कुबल, श्री. पराग बोंद्रे, श्री.गौरव कडवेकर, श्री.रजत एकणेकर, श्री. गजानन परब तसेच मैत्री ग्रुप सावरवाड येथील श्री.स्वामिनाथ कुडतरकर, श्रीम.पूर्वा कुडतरकर, श्री.मकरंद कुडतरकर, श्री.उदय कुडतरकर यांनी शिबीर यशस्वी करण्यास हातभार लावला. शिबिर यशस्वी करण्यासाठी श्रीम.डॉक्टर मसुरकर, श्रीम. रेडकर, श्रीम.बागेवडी या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा भीषण तुटवडा जाणवत असून शिक्षक समितीने राबविलेल्या रक्तदाबाचा उपक्रम प्रशंसनीय आहे. भविष्यातही शिक्षक समितीच्या वतीने आवश्यकता भासेल तेव्हा शिक्षक वर्गाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येईल अशी माहिती समिती अध्यक्ष सतिश राऊळ, सचिव अमोल कोळी व जिल्हा कार्याध्यक्ष नारायण नाईक यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six − three =