हायवेवर रस्त्यावरील खड्डेमुळे भिषण अपघात; महिला जबर जखमी
फोंडाघाट
काल रात्री हायवेवर भिषण अपघात झाला. अपघाताची तिव्रता एवढी मोठी होती.कि मोटर सायकल खड्यात जाउन वर उडाली. त्यात शोभा शंकर गोसावी कंट्रोलर श्री.गोसावी यांची पत्नी त्यात मागे उडुन पडल्यामुळे डोक्याला जबर मार लागला. फोंडाघाट प्रार्थमीक आरोग्य केंद्राची अॅंब्युलन्स ५ मिनीटात घटना स्थळी पोहचली. डाॅ.यादव यांनी अर्जंट कणकवलीला न्या असे सांगितले. कारण कानातुन नाकातुन रक्तस्राव होत होता.त्यामुळे सीटी स्कॅन करणे गरजेचे होते.डाॅ.नागवेकर यांचे कडे अॅडमीट करण्यात आले.अद्यापही त्या कोमात आहेत.अशी माहीती मिळाली. त्यांना बरे वाटोत अशी आशा सामाजीक कार्यकर्त अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केली. त्या बरोबर रस्त्याचे खड्डे त्वरीत बुजवावेत अशी मागणी करुन आज मंत्री नितेशजी राणे ओरसला येणार आहेत.त्यांच्याही कानावर हा विषय घालणार असे ते म्हणाले.*
*अजित नाडकर्णी,संवाद मिडीया.*