You are currently viewing CBSE बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर; ९९.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, निकालात मुलींची बाजी

CBSE बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर; ९९.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, निकालात मुलींची बाजी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच सीबीएसईने आज दुपारी २ वाजता १२ वीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ९९.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल ३१ जुलै पर्यंत जाहीर करावेत असे आदेश यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर या आठवड्यात सीबीएसईने एक महत्वपूर्ण बैठक घेतली होती.

ज्यामध्ये याच आठवड्यात निकाल जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलेलं. त्यानुसार शुक्रवारी सीबीएसई बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. पण, यावर्षी टॉपर्सची गुणवत्ता यादी जाहीर झालेली नाही. यावेळी एकूण १२ लाख ९६ हजार ३१८ विद्यार्थी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. केंद्रीय विद्यालयातील १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यावेळीच्या १२ वीच्या निकालामध्ये १ लाख ५० हजार १५२ विद्यार्थ्यांनी ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत गुण मिळवले आहेत. तर ७० हजार ४ विद्यार्थी ९५ टक्क्यांहून अधिक गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्णतेची टक्केवारी बरीच सुधारली आहे. २०२० मध्ये, ८८.७८ टक्के विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती.

Cbseresults.nic.in, cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात. या व्यतिरिक्त, विद्यार्थी digilocker.gov.in, UMANG App आणि SMS द्वारे सीबीएसई १२ वीचा निकाल पाहू शकतात.

सीबीएसई १२ वीच्या निकालावर असमाधानी असलेले विद्यार्थी पर्यायी परीक्षा देऊ शकतात. शिक्षण मंडळानेही पर्यायी परीक्षेच्या तारखा १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत निश्चित केल्या आहेत. सीबीएसई १२वीचा निकाल आज जाहीर झाला आहे, लवकरच पर्यायी परीक्षांच्या नोंदणीसाठी अर्जासाठी वेवसाईटवर माहिती देण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा