You are currently viewing सांगोला तालुक्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख आबासाहेबांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा…

सांगोला तालुक्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख आबासाहेबांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा…

अफवांवर विश्वास ठेवू नका- कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांचे आवाहन

सिंधुदुर्ग

काल दिनांक 27 जुलै 2021 रोजी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याचे गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद असलेले अकरा वेळा एकाच पक्षातून निवडून आलेले धनगर समाज नेते माजी आमदार गणपतराव देशमुख आबासाहेब यांच्या निधनाची बातमी सोशल मीडिया वर सर्वत्र पसरली होती. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष श्री नवलराज काळे यांनी काल संध्याकाळी साडे पाचच्या दरम्यान आबासाहेबांचे नातू डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्याशी संपर्क करत सदर बातमी खरी का खोटी अशी विचारणा केली असता डॉ.बाबासाहेब बोलले सदर बातमी ही खोटी असून आबासाहेब सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे पण सोशल मीडिया वरती फिरत असलेली आबासाहेब यांच्या निधनाची बातमी खोटी आहे. आज सकाळी पुन्हा काळे यांनी आबासाहेबांची चौकशी केली असता त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा आहे असे त्यांचे नातू डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष विजयसिंह काळे यांना फोनवरून माहिती दिली. आमचे दैवत आबासाहेब यांच्याबद्दल फिरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका व त्यांच्या निधनाची बातमी कुठेही पसरवू नका असे नवलराज काळे यांनी जनतेला आवाहन करत आबासाहेब लवकरात लवकर बरे होऊन आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राच्या भूमीत उभे राहतील ईश्वर चरणी प्रार्थना केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + five =