You are currently viewing राष्ट्रीय महामार्ग भूसंपदानात खोटी इमारत दाखवून शासनाचे पैसे लाटणाऱ्या “त्या” परप्रांतीय व्यावसायिकाविरोधात आता शिवसेना प्रांत कार्यालयाला जाब विचारणार का..?

राष्ट्रीय महामार्ग भूसंपदानात खोटी इमारत दाखवून शासनाचे पैसे लाटणाऱ्या “त्या” परप्रांतीय व्यावसायिकाविरोधात आता शिवसेना प्रांत कार्यालयाला जाब विचारणार का..?

शिवसेनेचे “ते” भ्रष्टाचाराविरोधी आंदोलन अधिकाऱ्यांवर बेकायदेशीर इमारतीचा मोबदला देण्यासाठी दबावतंत्र होते का..?

मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा शिवसेनेला सवाल.!

दोडामार्ग
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 सुधारणा उपक्रमात प्रकल्पग्रस्तांच्या भूसंपादन मोबदला वाटप प्रक्रियेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कुडाळ मालवणचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ प्रांत कार्यालयावर पुराव्यानिशी केलेला होता. परंतु सदर प्रकरणाने आज वेगळाच युटर्न घेतल्याचे प्रत्यक्ष परिस्थितीवरून दिसून आले आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेचीच गोची झालेली दिसून येते. ज्या परप्रांतीय व्यावसायिकांसाठी शिवसेनेचे आमदार व त्यांचे पदाधिकारी पोटतिडकीने भ्रष्टाचाराविरोधात महसूल अधिकाऱ्यांशी भांडत होते मुळात ते संपूर्ण संपादन मोबदला प्रकरण हेच शासनाची फसवणूक करून पैसे लाटण्याच्या प्रकार होता असे आता उघडकीस येत आहे. एका परप्रांतीय व्यापाऱ्यासाठी प्रांत कार्यालयावर हल्लाबोल करणारे आता सामान्य जनतेच्या खिशातील आणि महाराष्ट्राच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या परप्रांतीय व्यापारी आणि भ्रष्ट अधिकारी यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यासाठी शिवसेना स्टाईल हल्लाबोल करणार का हा खरा प्रश्न आहे. नाहीतर मागील आंदोलन हे नुसती स्टंटबाजी असून अधिकऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होता असाच म्हणावं लागेल.
आता शिवसेना सदर प्रकरणावर कोणती भूमिका घेणार आहे याचा खुलासा जिल्ह्यातील जनता मागत आहे.खोटी इमारत दाखवून शासनाची फसवणूक करणाऱ्या या परप्रांतीय व्यावसायिकावर फौजदारी गुन्हा करा अशी मनसेची मागणी असून खोटा प्रस्ताव सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांची देखील विभागीय चौकशी व्हावी यासाठी मनसे जिल्ह्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − sixteen =