You are currently viewing एक हात मदतीचा – आपल्या माणसांसाठी आपल्या माणसांचा

एक हात मदतीचा – आपल्या माणसांसाठी आपल्या माणसांचा

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग तर्फे विलवडे मळावाडी येथील पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक साहित्य वाटप

दुर्ग मावळा प्रतिष्ठान गडसंवर्धना बरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. यातीलच एक भाग म्हणून आज रविवार दिनांक २५ जुलै रोजी सावंतवाडी तालुक्यातील विलवडे माळवाडी येथील पूरग्रस्त ३५ कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले.
सावंतवाडी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विलवडे गावातील माळावाडी येथील ३५ घरांमध्ये पुराचे पाणी जाऊन नुकसान झाल्याचे कळताच दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी प्रत्यक्ष विलवडे मळावाडी येथे जाऊन तेथील ग्रामस्थांची भेट घेऊन धीर दिला. तसेच ३५ कुटुंबांना तांदूळ, तूळडाळ, हरभरा, तेल, मीठ, मसाला हळद इत्यादी साहित्य वाटप केले. येथील ग्रामस्थांनी दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे आभार व्यक्त केले.
यावेळी कोकण विभाग अध्यक्ष गणेश नाईक, उपाध्यक्ष लिनेश धुरी, सरचिटणीस सुनिल करडे, महिला अध्यक्ष वेदिका मांडकूलकर, कार्याध्यक्ष समिल नाईक, सामाजिक उपक्रम विभाग प्रमुख समीर धोंड उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 9 =