You are currently viewing दोडामार्ग तालुक्यात धुवांधार पावसामुळे सर्वत्र पुरसदृश्य परीस्थिती; जनजीवन विस्कळीत

दोडामार्ग तालुक्यात धुवांधार पावसामुळे सर्वत्र पुरसदृश्य परीस्थिती; जनजीवन विस्कळीत

अनेक गावांचे संपर्क तुटले: कॉजवे पाण्याखाली

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने तालुक्यासह इतर ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटल्याचे नागरिकांचे हाल होत आहेत. मुख्यराज्यमार्गावरील अनेक काँजवे पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचबरोबर घोटगे परमे भेडशी हेवाळे येथील काँजवेवर पाणी आल्याने पाणी थेट आसपासच्या घरामध्ये शिरुन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घोटगे परमे घोटगेवाडी कुडासे मनेरी सासोली या गावात मोठया प्रमाणात केळीची लागवड भातशेतीची लागवड केली जाते,परंतु दोन दिवस पावसाने घातलेल्या धुमाकुळात पूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे, हातातोंडाशी आलेला घास पुरामुळे वाहून गेला आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. धुवांधार पावसामुळे सर्वत्र पुरसदृश्य परीस्थिती निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − sixteen =