You are currently viewing महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानातून मालवण शहरात ३ कोटींच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता

महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानातून मालवण शहरात ३ कोटींच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची माहिती; पालकमंत्री, आमदार, खासदारांचे मानले आभार

मालवण 

महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान सहाय्यक अनुदान योजनेतून मालवण शहरात सुमारे ३ कोटी २० हजार ३८ रुपयांच्या विविध १४ विकास कामांना जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजूलक्ष्मी यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. यातून शहरात आवश्यक असलेल्या विकास कामांना चालना मिळणार आहे. शहरवासीयांची मागणी लक्षात घेऊन हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आभार मानले आहेत.

मालवण शहरातील या विकास कामांमध्ये धुरीवाडा प्राथमिक शाळा शेडचे बांधकाम करणे ६ लाख ७८ हजार रुपये, चिवला बिच स्मशानभूमी कंपाउंड भिंतीची उंची वाढवणे ६ लाख १४ हजार ६१९ रुपये, मालवण बोर्डिंग ग्राउंड येथे अस्तित्वातील जिम एरिया परिसर विकसित करणे १० लाख १२ हजार ७२७ रुपये, वायरी गर्देरोड परब घर ते मोंडकर घर रस्त्यास गटार आधार भिंत बांधणे २० लाख ९२ हजार ८९६ रुपये, भरड भाट येथील चिपकर घर रस्ता डांबरीकरण करणे व गटार बांधकाम करणे ७ लाख २९ हजार २६० रुपये, भरड येयचे पे अँड पार्क वाहनतळ विकसित करणे ३७ लाख ६६ हजार, मालवण नगर परिषद हद्दीमध्ये वायरी तारकर्ली रस्ता ते गावकरवाडा श्रीपाद पाणंद जोडरस्ता तयार करणे व रस्ता मजबूतीकरण करणे १२ लाख ९४ हजार ८८० रुपये, शहरातील विकासकांकडून नगरपरिषदेच्या ताब्यात दिलेल्या जागांचा पर्यटनदृष्ट्या विकास करणे ७४ लाख ७५ हजार ८६१, एसटी स्टँड समोरील दलित वस्ती कडे जाणारा रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण करणे १६ लाख ३६ हजार ९३० रुपये, मालवण नगरपरिषद मच्छी मार्केट मधील पहिल्या मजल्यावर विद्युत व्यवस्था करणे ४ कोटी ३२ लाख ३५९ रुपये, आडवण येथील अस्तित्वातील गणेशकोंड नूतनीकरण करणे १५ लाख ५५ हजार १२६ रुपये, हॉटेल सायबा समोरील कोळंब खाडी लगतचा परिसर विकसित करणे व सुशोभित करणे ३० लाख ९५ हजार ३२० रुपये, धुरीवाडा बागायतघर ते गारुडेश्वर मंदिर पर्यंतचा रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे ७४ लाख ९२ हजार २८७ रुपये, साटम घर ते परुळेकर गल्ली पर्यंत पाणंद कॉंक्रिटीकरण करणे २६ लाख ३६ हजार ४९९ रुपये या कामांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × two =