शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

सिंधुदुर्गनगरी

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,सावंतवाडी मध्ये प्रवेश सत्र ऑगस्ट 2021 मंजूर असलेल्या,सुईग टेक्नॉलॉजी, कारपेंटर, कोपा, ड्रॉफ्टस्मन सिव्हील, मोटर मेकॅनिक व्हेईकल, फिटर, टर्नर, वायरमन तसेच, आयसीटीएसएम या व्यवसायांकरिता प्रवेश अर्ज भरणेची प्रक्रीया http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर 15 जुलै 2021 पासून ऑनलाईन पध्दतीने सुरु करण्यात आली आहे. अर्ज  भरल्यावर  स्वत: पूर्णपणे माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यावर प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन पध्दतीने Gateway च्या माध्यमातून भरणा करावे. अर्ज शुल्क राखीव उमेदवार शुल्क रुपये 100, अराखीव उमेदवार शुल्क रुपये 150, महाराष्ट्राबाहेरील उमेदवार रुपये 300, देशाबाहेरील उमेदवार रुपये 500, असे आहे.

         ऑनलाईन पध्दतीने अर्ज शुल्क भरल्यानंतर उमेदवारांनी त्वरीत आपल्या पंसतीनुसार व्यवसायनिहाय,संस्थानिहाय विकल्प भरावेत. प्रवेशाचे प्रसिध्द करण्यात आलेले वेळापत्रक हे सूचक दर्शक असून त्यामध्ये बदल संभवतो.

       तरी प्रवेशोच्छुक उमेदवारांनी अधिकच्या माहितीकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,सावंतवाडी मु. सावंतवाडी बाहेरचावाडा ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग क्र. 02363 295136, भ्रमणध्वनी क्रमांक 9423304735, 9420910912  संपर्क  साधावा असे प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा