You are currently viewing कुडाळ राष्ट्रीय काँग्रेसची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

कुडाळ राष्ट्रीय काँग्रेसची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

कुडाळ
व्हाॅटस् ॲप ग्रुप वर राजकीय, सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करणारे मॅसेज पाठल्यामुळे प्रा.नितीन सावंत यांच्यावर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार कुडाळ पोलीस ठाण्यात कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तसेच जिल्हा पदाधिकारी यांनी केली.
माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी.चिदंबरम यांचे पुत्र किर्ती चिदंबरम यांच्या नमाज पठण करत असतानाचे खोटे फोटो प्रसारित करून काँग्रेस व महाविकास आघाडीतील नेत्यांचे चुकिचे व बदनामकारक मॅसेज पाठवून धर्मा- धर्मा मध्ये तेढ निर्माण होईल असे काम करत आहेत. सदर व्यक्ती सरकारी नोकर आहेत व यापूर्वी अनेक वेळा समज देऊन सुध्दा ते जाणून बुजून काँग्रेस व महाविकास आघाडीतील नेत्यांची बदनामी करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सायबर क्राईम अंतर्गत कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी कुडाळ पोलीस ठाण्यात काँग्रेस पक्षा तर्फे मागणी वजा तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा