प्रांताधिकारी वैशाली राजमाने व तहसीलदार पवार यांनी केली खारेपाटण पूरस्थितीची पाहणी…

प्रांताधिकारी वैशाली राजमाने व तहसीलदार पवार यांनी केली खारेपाटण पूरस्थितीची पाहणी…

कणकवली

मुसळधार पावसामुळे खारेपाटण मध्ये पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून दुपारी कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने व कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांनी खारेपाटण गावाला भेट दिली व येथील पुरपरस्थितीची पाहणी केली.

या यावेळी खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत,ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटणकर,मंडल अधिकारी मंगेश यादव,ग्रामविकास अधिकारी जि.सी .वेंगुर्लेकर,तलाठी के. वाय. सिंगनाथ,खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस प्रमुख उद्धव साबळे आदी अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
खारेपाटणच्या पुरपरिस्थितीबाबत प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्याशी चर्चा केली. व प्रशसनाच्या वतीने पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी होडीची व्यवस्था करणार असल्याचे तहसीलदार आर. जे. पवार यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा