वेंगुर्ले तालुक्यात भाजपच्या समर्थ बुथ अभियानाचा शुभारंभ

वेंगुर्ले तालुक्यात भाजपच्या समर्थ बुथ अभियानाचा शुभारंभ

वेंगुर्ले तालुक्यातील आसोली शक्ती केंद्रातील बुथरचना परिपूर्ण केल्याबद्दल शक्ती केंद्र प्रमुखाचा सत्कार

” मेरा बुथ सबसे मजबूत ” हे घोषवाक्य घेऊन तालुक्यातील ९३ बुथ मजबूत करा – प्रसंन्ना देसाई , जिल्हा सरचिटणीस .

वेंगुर्ला

भाजपा तर्फे पक्षवाढीसाठी वेगवेगळी अभियान राबविण्यात येतात. त्यामुळे पार्लमेन्ट ते पंचायत पोहोचलेला विस्तार आता बुथ पर्यंत होण्यासाठी, तसेच बुथप्रमुख व बुथसमीती सक्षम करण्यासाठी शक्ती केंद्र प्रमुख नेमलेले आहेत. या शक्ती केंद्र प्रमुखांच्या माध्यमातून बुथसमीती गठीत करून पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवीण्याकरीता समर्थ बुथ अभियानाचे आयोजन केले असल्याचे जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी सांगितले.

वेंगुर्ले तालुक्यामध्ये २१ शक्ती केंद्र निहाय बैठकीचे आयोजन केले आहे. व त्याचा शुभारंभ उभादांडा जि.प. मतदार संघातील आसोली शक्ती केंद्रामधील सागरतिर्थ येथे बैठक आयोजित करण्यात आली होती .यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, रेडी जि.प. सदस्य प्रीतेश राऊळ, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, ता. उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, आसोली शक्ती केंद्र प्रभारी सुजाता देसाई, शिरोडा उपसरपंच राहुल गावडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

६ जुलै ते १७ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेले समर्थ बुथ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक बुथ वर कार्यकर्त्यांची फळी तयार करून,  बेसीक बरोबर महिला मोर्चा,  युवा मोर्चा यांचीही कमीटी तयार करण्यात येणार आहे.

यावेळी आसोली शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर यांनी वेंगुर्ले तालुक्यात सर्वप्रथम आपल्या शक्ती केंद्रातील बुथरचना परिपूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सागरतिर्थ बुथप्रमुख बाळु वस्त, आसोली बुथप्रमुख गुरुनाथ घाडी, न्हैचीआड बुथप्रमुख संकेत धुरी, जोसोली बुथप्रमुख सचिन गावडे, अनु.जाती मोर्चा चे बाळा जाधव, बाळकृष्ण कुडव, राधाकृष्ण बागकर, सवीता देवजी, विराज वस्त,  अनुराधा मोटे, स्वप्निल बागकर, प्रथमेश बागकर, देवेंद्र वस्त, शैलेश बागकर, अक्षय बागकर, रुपेश बागकर, अंकीत बागकर, सचिन वस्त, वृंदा वस्त, वासंती खोरजुवेकर इत्यादी उपस्थित होते.

यावेळी सागरतिर्थ बुथ मध्ये महीला बुथप्रमुख म्हणून अनुराधा बाळकृष्ण मोटे व युवा मोर्चा बुथप्रमुख म्हणून स्वप्निल लक्ष्मण बागकर यांची नियुक्ती करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा