You are currently viewing कणकवली गांगोमंदिर ते टेंबवाडी रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करणार : समीर नलावडे

कणकवली गांगोमंदिर ते टेंबवाडी रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करणार : समीर नलावडे

कणकवली

कणकवली गांगोमंदिर ते टेंबवाडी रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिल्या असून तात्काळ कामाला सुरुवातही करण्यात आली आहे. कणकवली शहरातील गांगोमंदिर ते हिंद छात्रालय टेंबवाडी या रस्त्याची संततधार पावसामुळे अक्षरशः चाळण झाली असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांना समजताच तात्काळ घटनास्थळी जात पाहणी करून रस्ता दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले.

नवीन डीपी प्लॅन नुसार सुसज्ज रस्ताही या मार्गावर तयार होणार आहे पण भूसंपादना अभावी टेंबवाडी भागातील आम्रपाली इमारती समोरील आणि सावंत यांच्या घरासमोरील रस्त्याचे डांबरीकरण हे जमीन मालकाच्या हरकतीमुळे रखडले आहे. पण संततधार पावसामुळे आम्रपाली अपार्टमेंट समोरील नगरपंचायतीचा रस्ता पूर्ण चिखलमय झाला असल्याची माहिती मिळताच नगराध्यक्ष यांनी या रस्त्याची पाहणी करून दुरुस्ती करण्याचे आदेश दिले असल्याने टेंबवाडीतील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा