You are currently viewing ओवळीये खून प्रकरणात सख्ख्या भावानेच केला भावाचा खून

ओवळीये खून प्रकरणात सख्ख्या भावानेच केला भावाचा खून

सावंतवाडी

सख्या भावानेच भावाचा खून केल्याचा प्रकार ओवळीये येथे घडला आहे. परिस्थितीजन्य पुरावे तसेच श्वानापथकाने माग दाखविल्यानंतर मृत लवू सावंत यांचा सख्खा भाऊ तसेच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अजित रामा सावंत याला सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. आज त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. या गुन्ह्यात पुरावे जरी मिळाले असले, तरी आपण खून केलाच नाही अशी भूमिका संशयित अजित सावंत यांनी घेतली आहे. त्यामुळे मोबाईल सी. डी. आर च्या माध्यमातून तसेच अन्य पुराव्याच्या शोधात आम्ही आहोत. या प्रकरणात आणखी काही जण असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा संशय सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी व्यक्त केला आहे.

ओवळीये येथील शेतकरी लवू सावंत यांचा काल खून झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यांच्या डोक्यात चिर्‍याने प्रहार करून त्यांना जीवे मारहाण करण्याचा प्रयत्न झाला होता. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर आता संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या अजित सावंत यानेच सावंतवाडी पोलिसांना माहिती दिली होती. तसेच जमिनीच्या वादातून हा प्रकार उघड झाल्याचे म्हटले होते. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात तसेच श्वानाने माग घेतल्याप्रमाणे अजित सावंत याला सावंतवाडी पोलिसांनी काल सायंकाळी ताब्यात घेतले. दरम्यान त्यानंतर झालेल्या चौकशीत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × three =