मराठवाड्यात अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा, धरणक्षेत्रात पाऊसच नाही!

मराठवाड्यात अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा, धरणक्षेत्रात पाऊसच नाही!

गेले तीन ते चार दिवस मुंबई आणि कोकणात धुवाँधार पाऊस बरसतोय. मात्र दुसरीकडे मराठवाड्याला अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. दरवर्षीप्रमाणे मराठवाडा अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहे. जुलै महिन्याचे 20 दिवस उटलून गेले आहेत. पण पावसाने म्हणावं असं दर्शन दिलेलं नाहीय.उर्वरित महाराष्ट्रात वरुणराजाने हजेरी लावली असली तरी मराठवाड्यात मात्र पावसाने दडी मारल्याचं चित्र आहे.

मराठवाड्यात मात्र अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. मोठ्या पावसाअभावी मराठवाड्यातील अनेक धरणे भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आज संपूर्ण मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. औरंगाबाद जिल्ह्यात आज तुरळक पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. गेले अनेक दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र आज तुरळक पावसाच्या अंदाज आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा