You are currently viewing ‘लायन्स – लायनेस’च्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

‘लायन्स – लायनेस’च्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

सावंतवाडी
सावंतवाडी लायन्स आणि लायनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आणि डॉ गोविंद जाधव यांच्या सहकार्यातून सावंतवाडी तालुक्यातील दाभिल या गावात वैद्यकीय आरोग्य शिबिर दि. १३ डिसेंबर रोजी पार पडले. या शिबिराचे उद्घाटन गावचे मानकरी अनिल गवस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबचे सेक्रेटरी अँड परिमल नाईक यांनी क्लबची जागतिक व्याप्ती आणि सेवाभावी उपक्रम याबाबत माहिती दिली. तर लायनेस अध्यक्षा अपर्णा कोठावळे यांनी महिलांनी आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.

डॉ. गोविंद जाधव यांनी मधुमेह व हृदय रोग यापासून संरक्षण कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी झालेल्या आरोग्य शिबिरास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी लायन्स क्लब अध्यक्ष अशोक देसाई, खजिनदार विद्युत तावडे, संतोष चोडणकर, गजानन नाईक, प्रशांत कोठावळे, अमेय पै, महेश कोरगांवकर, प्रसाद परब, रोहित नाडकर्णी, आदी उपस्थित होते. यावेळी गवस आणि घाडी कुटुंबीयांनी हे आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी क्लबला मोलाचे सहकार्य केले. तसेच नोंदणी करण्यासाठी अदिती कोठावळे हिने सहकार्य केले आहे. यावेळी आभार प्रदर्शन करताना अशोक देसाई यांनी क्लब तर्फे अशीच सामाजिक कार्यक्रम करत राहू असे आश्वासन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + seven =