वारी पंढरीची

वारी पंढरीची

निघाली ही वारी पंढरपुरी
विटेवरी उभा माझा सावळा हरी !!धृ!!

सावळ्या हरीला आवड तुळस
डोईवर तुळशी चाले वारकरी.
चंदनाची उटी सर्वांगा लेवूनी
झाला अभिषेक विठ्ठला पंढरी !!१!!

तुळशीमाळा गळा कर कटेवरी
मस्तकी मुकुट भासे लिंगापरी.
कर्णीयांत डुलती मकर कुंडले
पुंडलिक भेटी जाई विठ्ठल द्वारी !!२!!

विठू नामाचा जयघोष चाले,
गजर घुमे दाही दिशा अंबरी.
टाळ वीणा चिपळी मृदंग वाजे
भक्तीरसामध्ये चिंब वैष्णव भूवरी !!३!!

शोभे भाळी धूळ विठू चरणाची
वसे भावभक्ती राऊळा अंतरी.
माऊलींची पालखी येई पंढरी
भक्तीचा हा मेळा चंद्रभागे तीरी !!४!!

(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा