You are currently viewing कोविडसाठी जिल्ह्यातील दोन खाजगी रुग्णालये अधिग्रहीत – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

कोविडसाठी जिल्ह्यातील दोन खाजगी रुग्णालये अधिग्रहीत – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी :

जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा विचार करता अतिरिक्त उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील दोन खाजगी रुग्णालये अधिग्रहीत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे. यामध्ये कणकवली येथील डॉ. विद्याधर तायशेटे यांचे संजीवन सर्जिकल ॲण्ड ॲक्सिडेंटल हॉस्पिलट आणि मालवण येथील डॉ. विवेक रेडकर यांचे रेडकर हॉस्पिटल ॲण्ड रिसर्ज सेंटर या दोन रुग्णालये अधिग्रहित करण्यात आली आहेत.

संजीवनी रुग्णालयामध्ये 6 खाटा तर रेडकर रुग्णालयामध्ये 18 खाटा कोविड रुग्णांसाठी राखिव असणार आहेत. यासाठी शासनाने मंजूर केलेले दर रुग्णालयांमार्फत आकारण्यात येणार आहेत. हे दर पुढील प्रमाणे आहेत. नियमीत सेवा व विलगीकरणासाठी रुपये 4 हजार, व्हेंटिलेटर शिवाय आयसीयु दर 7 हजार 500 तर व्हेंटिलेटरसह आयसियूचे दर 9 हजार रुपये या प्रमाणे शासनाने ठरवून दिले आहेत. हेच दर या दोन्ही खाजगी रुग्णालयामध्येही आकारण्यात येतील. याबाबत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आदेश दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + seventeen =