You are currently viewing पर्यावरण संरक्षणात युवकांची जबाबदारी

पर्यावरण संरक्षणात युवकांची जबाबदारी

या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन.

वैभववाडी

महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च शिक्षणमंत्री मा.विनोदजी तावडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक २० जुलै २०२१ रोजी वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. महाविद्यालयातील इतिहास विभागाच्यावतीने “पर्यावरण संरक्षणात युवकांची जबाबदारी” या विषयावर मंगळवार दि.२० जुलै रोजी दुपारी ठीक चार वाजता गुगल मिट ॲपवर पांढरकवडा वन्यजीव विभागाचे विभागीय वन्यजीव अधिकारी मा.सुभाष पुराणिक यांचे व्याख्यान आयोजितन केलेले आहे. या व्याख्यानाचा लाभ महाविद्यालयातील विद्यार्थी, जिल्ह्यातील तरुण युवक, दुर्गप्रेमी, गिरिप्रेमी व निसर्गप्रेमी यांनी
https://meet.google.com/hkd-ftmv-oie
या गुगल मीट लिंकवरून घ्यावा असे आवाहन इतिहास विभाग प्रमुख प्रा.श्री.एस.एन. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी एस काकडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 2 =