You are currently viewing साई गुणगान

साई गुणगान

साईनाथा तुझे किती गुण गाऊ
मूर्ती ही डोळेभरी याची देही पाहू !!

रूप तुझे सुंदर दिसे मनोहर
माया ममतेचा तूचि आगर
भक्तजन येती साई नाम घेती
शिर्डीत लोटे हा जनसागर.

श्रद्धा सबुरी हा महामंत्र दिला
मनशांती विश्वास शिर्डीत भेटला
सबका मलिक एक हा उपदेश
साईबाबांनी जनांस केला.

कुणी म्हणे दत्त विष्णू अवतार
कुणी शिव अवतार मानती.
सर्वधर्म साईबाबांना समान
राम रहीम साई एकच म्हणती.

बाबांची उदी व्याधी दूर करी
कित्येक चमत्कार बाबांच्या पदरी.
नित्य साई स्मरण करुनी शरण
अन्न वस्त्र त्यास निवास उदरी.

©(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − three =