You are currently viewing हा आहे मुंबई- गोवा महामार्ग

हा आहे मुंबई- गोवा महामार्ग

हा नदी किंवा नाला नव्हे. हा आहे मुंबई गोवा महामार्ग. सार्वजनिक बांधकाम भ्रष्टाचार विभागाच्या निर्लज्ज, बेफिकीर व भ्रष्टाचारी कारभाराचा उत्तम नमुना.
प्रशासन व लोकप्रतिनिधी किती कोडगे आहेत ते हा बांदा दोडामार्ग रस्त्यावरुन प्रवास करताना जागोजागी दिसुन येते.

वास्तविक हा रस्ता सार्वजनिक बांधकाम भ्रष्टाचार विभागाच्या अखत्यारित येतो. कुठच्याही रस्त्यावर इतर कोणत्याही विभागाला काम करायचे असेल तर ते सांबा विभागाच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन व रस्ता पुर्ववत करण्याची जबाबदारी घेऊन करावी लागते. पण या रस्त्याच्या बाबतीत सर्व नियम व रीतीरिवाज धाब्यावर बसवून सर्व सामान्य जनतेचा तसेच वाहन चालकांचा छळ केला जात आहे. संपुर्ण रस्ता गटाराविना पावसात नदी नाल्या प्रमाणे लाल पाण्याने वहात आहे.
बांदा शासकीय विश्रामगृहाच्या गेट पासुन म़ोठमोठे खड्डे पडलेले आहेत पण त्याची दखलही कोणी घेत नाही. उन्हाळ्यात भरवस्तीतुन गेलेला हा राज्य मार्ग आजुबाजुला असलेल्या घरातील नागरिकांना गेली अनेक वर्षें शब्दशः अर्थाने अन्नासोबत व प्रत्येक श्वासासोबत धुळ खायला भाग पाडतो. अनेक आंदोलने झाली, आश्वासने दिली गेली पण रस्ता काही सुधारला नाही.
सार्वजनिक बांधकाम भ्रष्टाचार विभागाचे कार्यकारी अभियंता श्री माने यांनी मे महिन्यात भाजप शिष्टमंडळाने घेराव घातला असता खोटे आश्वासन देऊन आपली सुटका करून घेतली. त्यानंतर आजतागायत त्यांच्या आश्वासनांचे काय झाले ते त्यांनाच माहीत.
काम चोर व भ्रष्टाचारी अभियंत्यांचे लोकप्रतिनिधी हे भाऊ, आबा, नाना,मामा असले की त्या नात्याच्या जोरावर भ्रष्ट अधिकारी एका रात्रीत आपली बदली दोडामार्ग वरुन सावंतवाडी विभागात करून आंबोली सारखी दुभती म्हैस गळाला लावू शकतात ते आपल्या काही इमानी सहकाऱ्यांसमोर काय आदर्श ठेवणार? तसेच अशा भ्रष्टाचारी अभियंत्यांचे कोण काय वाकडे करू शकणार?

डी के सावंत

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 2 =