You are currently viewing तोपर्यंत प्रांताधिकाऱ्यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव पाठवा!

तोपर्यंत प्रांताधिकाऱ्यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव पाठवा!

राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळ कन्याळकर व कुडाळ तालुकाध्यक्ष भास्कर परब यांनी केली जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

कुडाळ :

कुडाळ-मालवणच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांची विभागीय आयुक्त स्तरावरुन चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर न पाठविता बडतर्फीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवावा. तसेच हे प्रकरण लाचलुचपत विभागाकडे चौकशीसाठी सोपवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळ कन्याळकर व कुडाळ तालुकाध्यक्ष भास्कर परब यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. सौ. खरमाळे यांची विभागीय आयुक्त स्तरावरुन चौकशी करण्याचे आदेश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. पूर्वीच्या त्रिस्तरीय समितीचा चौकशी अहवाल तुम्ही स्वीकारलेला नाही, असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसला दिले आहे. विभागीय आयुक्त स्तरावरुन चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले असले, तरीही प्रांत यांच्या उपस्थितीत त्यांचीच चौकशी करणे अयोग्य आहे. प्रथम त्यांना महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवून त्रिस्तरीय समितीने चौकशी केली होती. त्याचप्रमाणे या प्रकरणाची निपक्षपणे चौकशी करण्यासाठी त्यांना सर्वप्रथम बडतर्फ करून हे प्रकरण लाचलुचपत का सोपवावे, असे या द्वयींनी म्हटले आहे. ज्या कारणाने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. त्या कारणाचा अद्याप उलगडा झालेला नाही. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत खरमाळे यांचा बडतर्फीचा प्रस्ताव पाठवावा, अशीही मागणी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =