You are currently viewing सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांतुन दोन नीट परीक्षा केंद्र मंजूर

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांतुन दोन नीट परीक्षा केंद्र मंजूर

वैद्यकीय आणि औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नीट परीक्षा द्यावी लागते.मात्र या नीट परीक्षेचे केंद्र सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नसल्याने विद्यार्थ्यांना गोवा येथे ही परीक्षा देण्यासाठी जावे लागत होते. याबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे सिंधुदुर्ग व रत्नागिरी मध्ये नीट परीक्षा केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात ना. उदय सामंत व उच्च व तंत्रशिक्षण विभागाने केंद्राच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.त्यानुसार नीट परीक्षेची देशात नवीन 55 केंद्रे मंजूर करण्यात आली त्यामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये दोन नीट परीक्षा केंद्र मंजूर करण्यात आली आहेत.अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 4 =