You are currently viewing भू-जल सर्वेक्षण आणि विकासयंत्रणा सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त गुरुवारी रक्तदान शिबिर

भू-जल सर्वेक्षण आणि विकासयंत्रणा सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त गुरुवारी रक्तदान शिबिर

सिंधुदुर्गनगरी

भू-जल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या स्थापनेला शुक्रवार दि. 16 जुलै 2021 रोजी 50 वर्ष पूर्ण होत असल्याने, या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भू-जल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाचे प्रभारी वरिष्ठ भूवैज्ञानिक सागर देसाई यांनी दिली.

              या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त गुरुवार दि. 15 जुलै रोजी सेतू सुविधा व माहिती केंद्र शेजारील सभागृह (स्पर्धा परिक्षा अभ्यासिका) येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भू-जल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये रक्तदान करु इच्छिणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांनी आपली नावे व संपर्क क्रमांक वरिष्ठ भूवैज्ञानिक, भू-जल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या कार्यालयात बुधवार दि. 14 जुलै 2021 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत कळवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 16 =