You are currently viewing हॉकी विश्वचषक २०२३ : जर्मनी विश्वविजेते

हॉकी विश्वचषक २०२३ : जर्मनी विश्वविजेते

*सडन डेथ शूटआऊटमध्ये बेल्जियमवर ५-४ ने मात*

 

*जर्मनीने तिसऱ्या विजेतेपदासाठी १७ वर्षांची प्रतीक्षा संपवली*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

जर्मनीने बेल्जियमला सडन डेथ शूटआऊटमध्ये ५-४ असे नमवून हॉकी विश्वचषक स्पर्धेचे तिसर्‍यांदा विजेतेपद पटकाविले. गतविजेत्या बेल्जियमला विजेतेपद राखण्यात अपयश आले. पूर्ण वेळेपर्यंत सामना ३-३ असा बरोबरीत राहिल्यानंतर शूटआटमध्येही ३-३ अशीच बरोबरी झाली. त्यामुळे सामना सडन डेथ शूटआऊटमध्ये खेळविण्यात आला.

हॉकी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ०-२ ने पिछाडीवर असताना जर्मनीने जोरदार आक्रमण करत बेल्जियमला  नामोहरम केले. त्यामुळे जर्मनीला २००६ नंतर प्रथमच हॉकी विश्वचषक उंचावण्याची संधी मिळाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − seven =