सिंधुदुर्गनगरी
कर्ली खाडी किनारी जॅक वाळूत रुतल्याने अपघात होऊन बोटीखाली सापडून एका कामगाराचा मृत्यू झाला होता. अपघातातील ही बोट एमटीडीसीची नसल्याचे एमटीडीसीचे प्रादेशिक पर्यटन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, अपघात बातमीमध्ये एमटीडीसीच्या बोटीचा उल्लेख करण्यात आला आहे. ही बोट महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची नव्हती. विनापडताळणी आशयाच्या वृत्तामुळे वाचकांच्या मनात एमटीडीसीबाबत नाहक गैरसमज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वृत्त देण्यापूर्वी संबंधिताने खात्री करणे आवश्यक होते, असेही यात म्हटले आहे.