You are currently viewing शाळेची घंटा लवकरच वाजणार…

शाळेची घंटा लवकरच वाजणार…

पहिल्या टप्यात आठवी ते बारावीचे वर्ग चालू होणार

राज्यातील कोविड मुक्त क्षेत्रात ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ठरावाने पहिल्या टप्यात शाळेतील इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरू करण्यास शिक्षण विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. वर्ग सुरू करण्यापूर्वी व सुरू झाल्या नंतर करावयाच्या उपाय योजना शासनाकडून स्पष्ट करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात कोविड मुक्त गावातील ग्रामपंचायतिने त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या गावातील शाळेतील इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरू करण्याबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करणे आवश्यक आहे.

विशेष एसोपी पाळावी लागणार
शाळा सुरू करताना मुलांना टप्याटप्यात शाळेत बोलावण्यात यावे. उदा.वर्गाना अदला-बदलीच्या दिवशी/ सकाळी-दुपारी, ठराविक कोअर विषयांसाठी प्राधान्य यासाठी विशेष एसोपीचे पालन करावे लागणार आहे. कोरोना संबंधित सर्व खबरदारींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे या निर्णयात नमूद करण्यात आले आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विध्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विध्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे.
शाळा सुरु करण्यापूवी व शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजनाां बाबतच्या मार्गदर्शक सूचना या शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत. शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे, थर्ममिटर, सॅनिटायझर इत्यादी आवश्यक वस्तुची उपलब्धता तसेच शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाने निश्चित करावे. एखाद्या शाळेत क्वारांटाईन सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थानापन्न करावे. व शाळेचे पूर्ण निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.

पालकांच्या संमतीवर वर्ग चालू होणार
शाळेतील शिक्षकांच्या कोविड टेस्ट करणे आवश्यक असून स्टाफ रुम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतर राखून करणे आवश्यक आहे. एका बाकावर एकच विध्यार्थी तसेच शाळेच्या दर्शनी भागावर मास्कचा वापर याबाबत सूचना फलक लावणे व थुंकण्यावरील बंदीची काटेकोर अमलबजावणी होणे आवश्यक आहे. शाळेतील कार्यक्रम आयोजनावर बंदी करण्यात आली असून अधिक गर्दी होऊ शकणारे परिपाठ, स्नेहसंमेलन असे कार्यक्रम करता येणार नाही आहेत. विध्यार्थी यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णतः पालकांच्या संमतीवर अवलंबून असणार आहे.

स्थानिक प्रशासन निर्णय घेणार
१४ मार्च २०२१ रोजी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लॉक डाऊन जाहीर झाला नंतर शाळा बंदच आहेत. १५ जून पासून शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष चालू झाले असून मुलांसाठी शाळा चालू होण्याची मात्र प्रतीक्षा होती. शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने ५ जुलै च्या शासन निर्णयाने स्वतः कुठलीही जबाबदारी न घेता शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. विध्यार्थ्यांना प्रवासासाठी आवश्यक एसटीची सुविधा अद्यापि ग्रामीण भागात सुरू झाली नसून शाळा चालू करताना एसटीची सुविधा सुद्धा चालू करणे आवश्यक आहे.एकूणच कोविड मुक्त क्षेत्रातील भागात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग लवकरच चालू होण्याचे संकेत शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयातून मिळत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 2 =