You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोल वसुली जनआंदोलन – अमित सामंत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोल वसुली जनआंदोलन – अमित सामंत

 *राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रखर विरोध*

सिंधुदुर्ग :

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर ओसरगाव येथील टोलनाक्यावर टू व्हीलर, थ्रीव्हीलर वाहने वगळता अन्य वाहनांची टोल वसुली सुरू करण्यात येत असल्याचे टोल वसुली कंपनीने सुतोवाच केले आहे.

अनेक कामे अपूर्ण अवस्थेत आहेत,स्थानिकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे,वारंवार जनतेच्या माध्यमातून प्रखर आंदोलन करून न्याय मागण्याचा प्रयत्न होत आहे,जनतेच्या या मागण्यांकडे नॅशनल हायवे ॲथॉरीटी दुर्लक्ष करत आहे,मात्र या सर्व समस्यांची सोडवणूक करण्याचे सोडून टोल एजन्सीच्या माध्यमातून टोल वसुली करण्याचा घाट घातला जात आहे,हे निंदनीय असून,केंद्र सरकारच्या पुढाकाराने टोल एजन्सीच्या माध्यमातून टोल वसुली सुरू केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेला सोबत घेऊन ओरोस टोल नाक्यावर जन आंदोलन उभारेल असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष श्री अमित सामंत यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + twelve =