You are currently viewing महापुरुष बामणादेवी मित्रमंडळ घावनळे-बामणादेवी मित्रमंडळा तर्फे भव्य खुल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

महापुरुष बामणादेवी मित्रमंडळ घावनळे-बामणादेवी मित्रमंडळा तर्फे भव्य खुल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

कुडाळ

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शनिवार दिनांक १४ जानेवारी ते रविवार दिनांक १५ जानेवारी या दिवशी खुल्या अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आले असून या स्पर्धा बामणादेवी घावनळे,तालुका कुडाळ येथे होणार आहेत. या सामन्याची प्रवेश फी ५०० रुपये आहे .शनिवार दिनांक १४ जानेवारी रोजी नोंदणी करणाऱ्या किंवा सहभागी होणाऱ्या संघास ४०० रुपये फी भरावी लागणारे आहे.

प्रथम पारितोषिक:६६६६ रुपये,बकरा आणि आकर्षक चषक असणार आहे. द्वितीय पारितोषिक:३३३३ रुपये ,५ गावठी कोंबडे व आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक: ११११ रुपये आणि एक गावठी कोंबडा व आकर्षक चषक असणार आहे. तसेच उत्कृष्ट गोलंदाजास १ कोंबडा व चषक मिळणार आहे. उत्कृष्ट फलंदाजास एक कोंबडा व चषक मिळणार आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकास एक कोंबडा व चषक मिळणार आहे. आणि उत्कृष्ट संघास एक कोंबडा व चषक मिळणार आहे.

या सामन्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी सामन्यात सलग ३ बॉल मध्ये ३ सिक्स मारल्यास ६ अंडी मिळणार आहेत. तसेच सलग ६ बॉल मध्ये ६ सिक्स मारल्यास १२ अंडी मिळणार आहेत. तर सलग ३ बॉल मध्ये ३ विकेट घेतल्यास ६ अंडी मिळणार आहेत .

अधिक माहितीसाठी संपर्क:
नागेश सावंत:९४२३०२४५५४ , आकाश मराठे:८३२१८१२१५२, चंदू मराठे:९४०४७ ७६१४८,प्रवीण सावंत:९८३४८४११०५

प्रतिक्रिया व्यक्त करा