You are currently viewing कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 48 मि.मी. पाऊस

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 48 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 48 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 21.75 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1163.26 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

            तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 05(1233), सावंतवाडी – 32(1438.10), वेंगुर्ला – 17(932), कुडाळ – 48(1057), मालवण – 42(1163), कणकवली – 04(1262), देवगड – 22(973), वैभववाडी – 04(1248), असा पाऊस झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × one =