You are currently viewing पंचम खेमराज कॉलेज ते वाचन मंदिर पर्यंत स्पीडब्रेकर बसवावे – राजेंद्र मसुरकर

पंचम खेमराज कॉलेज ते वाचन मंदिर पर्यंत स्पीडब्रेकर बसवावे – राजेंद्र मसुरकर

मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी नगरपालिकेने धूमस्टाईल मोटरसायकल वेगाने युवक चालवत असल्याने पंचम खेमराज कॉलेज पासून ते वाचन मंदिर पर्यंत सुमारे 10 स्पीडब्रेकर बसवावे, जेणेकरुन अनेक महिला तसेच युवतींना व वयस्कर वयोवृद्धांना रस्ता क्रॉसींग करणे जीव मुठीत घेऊन चालावे लागते.

यातच अनेक नागरिकांना गंभीर अपघात होऊन रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. त्यातच अनेक रुग्ण गंभीर अपघात होऊन मृत्युमुखी पडतात. यासाठी नगराध्यक्ष व सर्व नगरपालिकेचे सहकारी नगरसेवक यांनी वेळीच लक्ष घातल्यास अनेक नागरिकांचा बचाव होऊ शकतो.

यासाठी यापूर्वी 30 जुलै 2017 पूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना व तसेच त्याकाळचे मुख्याधिकारी यांना जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी एका निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्या निवेदनाची दखल न घेतल्याने मंत्रालय मुंबई नगरविकास विभाग संचालक यांच्याकडे मागणीची तक्रार देऊन नगरविकास सचिव यांनी अशा प्रकारचे आदेश 30 जुलै 2017 रोजी च्या जावक क्रमांक – एम यु पी 2017/ सं. क्रं – 1088/ नवि- 19. या नगरविकास खाते सचिव यांच्या आदेशाने सावंतवाडीचे तत्कालीन मुख्याधिकारी यांना आदेश प्राप्त झाले होते परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही नगरपालिकेकडून झालेली नाही हे दुर्दैव आहे.

परंतु सावंतवाडीचे नूतन मुख्य अधिकारी व नगराध्यक्ष तसेच नगरपालिकेचे सहकारी नगरसेवक यांनी आता वेळीच लक्ष घालून नुकत्याच झालेल्या महिलेच्या गंभीर अपघाताची दखल घेऊन याकडे लक्ष देऊन कार्यवाही करावी.

तसे नगरपालिकेकडून कारवाई न झाल्यास मला नगरविकास खात्याकडून पुन्हा दाद मागावी लागेल, वेळप्रसंगी नगरपालिकेच्या विरोधात जनतेच्या हिताच्या दृष्टीने न्यायालयीन लढा द्यावा लागेल.

असे निवेदन जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजेंद्र प्रभाकर मसुरकर निवेदनाद्वारे दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 15 =