You are currently viewing ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात; दोघा युवकांचा मृत्यू

ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात; दोघा युवकांचा मृत्यू

कणकवली

तालुक्यातील तिवरे-डामरे मार्गावरील साटमवाडी येथे दुपारी ३ च्या सुमारास ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील दोघे युवक जागीच ठार झाले. विशाल गजानन चव्हाण (२२), सूरज रमेश चव्हाण (१९) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही तिवरे-चव्हाणवाडी येथील रहिवासी आहेत.
आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ट्रकचालक संतोष हनुमंत चव्हाण आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन तिवरे ते फोंडा असा प्रवास करत होता. तर अपघातात मृत पावलेले विशाल आणि सूरज हे युवक दुचाकीनेने तिवरेच्या दिशेने जात होते. डामरेच्या वळणावर ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक बसली. या अपघातात ट्रकवर आदळून विशाल आणि सूरज हे जागीच ठार झाले. अपघातानंतर घटनास्थळावरून चालक संतोष याने पलायन करून कणकवली पोलीस ठाण्यात हजर झाला. दरम्यान अपघातानंतर ट्रक चालकाने पलायन केल्यामुळे मयत युवकांचे नातेवाईक प्रचंड संतापले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 8 =