You are currently viewing जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत इन्सुली नं. ५ शाळेने उज्वल यश…

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत इन्सुली नं. ५ शाळेने उज्वल यश…

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत इन्सुली नं. ५ शाळेने उज्वल यश…

बांदा

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नं. ५ शाळेने उज्वल यश संपादन केले. या शाळेमधील सिया विवेकानंद नाईक व सोहा इमदादखान बिजली या दोन विद्यार्थिनींची जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सांगेली सावरवाड येथे निवड झाली आहे.
या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक सुधीर गावडे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच शिक्षक भास्कर माजगावकर, हंसराज गवळे व शाळेचे मुख्याध्यापक धनंजय केरकर यांचेही सहकार्य लाभले. या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विवेकानंद नाईक व सर्व पदाधिकारी, इन्सुली उपसरपंच कृष्णा सावंत, इन्सुली केंद्रप्रमुख लक्ष्मीदास ठाकूर, माजी प्रभाग विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर तसेच सावंतवाडीच्या गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी अभिनंदन केले आहे.

WhatsApp

प्रतिक्रिया व्यक्त करा