You are currently viewing तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन कृषी क्षेत्राकडे वळावे – अनुश्री कांबळी

तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन कृषी क्षेत्राकडे वळावे – अनुश्री कांबळी

वेंगुर्ला

कोरोना काळात सर्व क्षेत्र कोलमडलेली असताना कृषी क्षेत्राने सर्वांना तारले. यामुळे आताच्या तरुण वर्गाने कृषी क्षेत्राकडे वळून यात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी यांनी केले.

पंचायत समिती व तालुका कृषी विभाग वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘कृषिदिन‘ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभागृहात सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसभापती सिद्धेश परब, गटविकास अधिकारी उमा घारगे-पाटील, पंचायत समिती सदस्य स्मिता दामले, तालुका कृषी अधिकारी हर्षा गुंड, पंचायत समिती कृषी अधिकारी विद्याधर सुतार, कृषी विस्तार अधिकारी सुप्रिया कोरगावकर, संदेश परब, कृषी पर्यवेक्षक मराठे, केसरकर, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी केरवडेकर, सहाय्यक लेखा अधिकारी दिनकर चाटे, मातोंड ग्रामविकास अधिकारी तुषार हळदणकर यांच्यासहीत इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी शुभदा कविटकर यांनी केले.

यानंतर मठ ग्रामपंचायत येथे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तर येथील सखाराम ठाकूर व प्रकाश ठाकूर यांच्या शेतात हळद रोपे लागवड प्रात्यक्षिक व महेश सावंत यांच्या शेतात ‘श्री‘ पद्धतीने भात लागवड प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी मठ सरपंच तुळशीदास ठाकूर, ग्रामसेवक केळुसकर, कृषी सहाय्यक चव्हाण आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + three =