You are currently viewing “मी लस घेतलंय, तुम्ही सुद्धा घेवा” सेल्फी पॉईंटचा पेंडुर येथे शुभारंभ

“मी लस घेतलंय, तुम्ही सुद्धा घेवा” सेल्फी पॉईंटचा पेंडुर येथे शुभारंभ

ग्रामपंचायत खरारे-पेंडुरचा लसीकरण जनजागृतीच्या निमित्ताने अभिनव उपक्रम..

मालवण :

गावागावात सध्या लसीकरणाची मोहीम जोरदार रावबिली जात आहे. परंतु लोकांच्या मनात सध्या लसीकरणा बाबत मोठ्या प्रमाणात समज गैरसमज भिती निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. याचं पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत खरारे पेंडूर च्या वतीने लोकांमध्ये लसीकरणा विषयी जनजागृती निर्माण व्हावी, लोकांची भीती कमी व्हावी, लोकांमध्ये एक आकर्षण निर्माण व्हावे व जास्तीत जास्त लोकांनी लसीकरणासाठी पूढे यावे यासाठी सेल्फी पॉईंट या अभिनव उपक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. “मी लस घेतलंय, तुम्ही पण घेवा” असा संदेशही यानिमित्ताने देण्यात आला आहे. गावातील लोकांचा या उपक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला आहे.

यावेळी सरपंच सौ सुनीता मोरजकर, आतिक शेख, शेखर फोंडेकर, ग्रामविकास अधिकारी निकम भाऊ, तलाठी नाकाडे मॅडम, कृषि सहाय्यक गिते मॅडम, रवींद्र गावडे, नांदोसकर सर, जयराम पटेल, केशव दादा परब, हुनुमंत केळुसकर, पंढरीनाथ काटकर, ग्रामपंचायत सदस्य शैलेश परब, अश्विनी पेडणेकर, नेहा परब, सुमित सावंत, मिलिंद चव्हाण, संदीप सरमळकर, सतीश कांबळी, संतोष राणे, अनिल पाटील तसेच ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा