कन्या वनसमृद्धी योजने निमित्त रोपे वाटप

कन्या वनसमृद्धी योजने निमित्त रोपे वाटप

वैभववाडी

दि.१ जुलै महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्याने कन्या वनसमृद्धी योजनेअंतर्गत वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण परिक्षेत वैभववाडी यांच्यावतीने ग्रामपंचायत खांबाळे येथे रोपे वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
एप्रिल २०२० ते मे २०२१ या दरम्यान जन्मलेल्या कन्या पालकांना कन्या वनसमृद्धि योजनेअंतर्गत प्रत्येकी दहा रोपे देऊन सन्मानित करण्यात आले.खांबाळे गावचे सरपंच सौ.गौरी गणेश पवार, उपसरपंच श्री. गणेश प्रकाश पवार यांचे हस्ते लाभार्थ्यांना रोपे वाटप करण्यात आली.
यावेळी वैभववाडी सामाजिक वनीकरणचे वनपाल श्री. प्रकाश पाटील वनमजूर श्री.तात्या ढवण, ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा