You are currently viewing अस्सलामु अलैकूम

अस्सलामु अलैकूम

वराहमतुल्लाह व बरकातुहू

आपल्या मुस्लिम धर्म प्रमाणे रमजान महिन्यातील अंतिम १० दिवसातील विषम रात्रीत “शबे कद्र” शोधावी असे संदेश आहेत या सोबतच अनेक धार्मिक तज्ञाचे मते हि आजची रात्र असू शकते , या रात्रीचे महत्व सांगणे हे तज्ञाचे काम आहे आपण या रात्री आपण जाणतेपणी अजाणतेपणी केलेले गुनाह पापे यांची निश्चित अल्लाह कडे माफी मागतो आज या रात्री आपण आत्मपरीक्षण हि करतो.
या रात्री आपले गुनाह माफ होतात , नेकी मिळतात अश्या अनेक बाबी आहेत. *विशेषतः प्रामुख्याने आपला भारत देश याच रात्री अल्लाह तआलाने पारतंत्र्यातून मुक्त केला आम्हाला स्वातंत्र्य दिले*
मला आज माझ्या तमाम मुस्लिम बांधव जे सार्वजनिक क्षेत्रात काम करीत आहेत त्यानं अल्लाह च्या मर्जी करिता नम्र व कळकळीची सध्याच्या परिस्थतीनुसार विनंती करावयाची आहे कि आज आपण आपल्या कार्याबाबत व ध्येय धोरण बाबत आत्मपरीक्षण करून आपल्यात बदल घडविण्याची दुआ व नियत करूया.
आपण वैयक्तिक रित्या आपल्या समाज बांधवांची विविध रूपाने मदत करीत असतो पण विविध संघटन, संघटना , समाज, संस्था, मंच जमात अश्या माध्यमातून काम करीत असताना आपण विचार करण्याची वेळ आलेली आहे कि हे काम आम्ही का करीत आहोत. (सध्याच्या राजकारणाच्या हेतूने करणाऱ्या बाबत न बोललेले बरे) याचे परीक्षण होणे फार गरजेचे आहे. हे काम अल्लाह च्या मान्यतेसाठी आहे तर दुसऱ्याला त्रास होणे दूर उजव्या हाताचे काम डाव्या हाताला समजत कामा नये पण जर हे काम आम्ही स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, नावासाठी , मोठेपणासाठी, जाहिरातीसाठी करत असू तर त्याचा उपयोग दोन्ही जगात आपल्याला शून्य असून त्याचे नुकसानच मोठे होणार आहे उलट ते कृत्य आपल्या तोंडावर मारले जाईल व याचे सध्या तरी संघटन, संघटना , समाज, संस्था, मंच जमात
याना मोठे नुकसान होत आहे व या मध्ये गरीब गरजू मुस्लिम बांधव बळी पडत आहेत. याचा गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे.
१) सध्या मुस्लिम बांधवानी विविध संघटन, संघटना , समाज, संस्था, मंच जमात या वाढविल्या पाहिजेत पण या मध्ये एकमेकात नको त्या बाबतीत शिंतोडे उडविण्यात , एकमेकांचे पाय ओढण्यात वेळ घालविला जात आहे तर आपण अश्या संघटना एकत्र येऊनच काम केले पाहिजे.
२) अश्या संघटना मधून पदांवर काम करीत असताना स्वतः च्या मोठ्या पणा करिता या पदाचा अजिबात उपयोग केला जाऊ नये, तसेच संघटनेतील इतर बहुसंख्य सदस्यांना आपण त्या पदं योग्य नाही असे वाटत असेल तर त्या संघटने साठी स्वतः होऊन बाजूला होणे योग्य या करिता सर्वाना व संघटनेला बळी पाडू नये.
३) आज आपणच आपापसात शासनाकडे तक्रारी करत असले मुळे अनेक वेळा गरजवंताला त्याची गरज पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे त्याचे व समाजाचे पर्यायाने सर्वांचे नुकसान होत आहे. ( आज गरजूना धान्य, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य मदत या वरील कारणा मुळे मिळू शकत नाही आहे.
४) आज कोव्हीड काळात मृत्यू पावणाऱ्याची नियमानुसार त्याची मयत / मृतदेह नातेवाईंकांकडे देता येत नाही व वीण धार्मिक आवश्यक संस्काराविना त्याची विल्लेवाट लावली जाते पण आपल्याच काही कष्टकरी सामाजिक भावनेतून स्वतःचे जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या तरुणांमुळे आपल्या मयत ला (गुसुल) अंघोळ नमाज व सर्व धार्मिक इमाम सुदैवाने पुरे होत आहेत.
५) घराघरात मतभेद असतात वाद असतात तसेच प्रत्येक ठिकाणी विविध ठिकाणी अंतर्गत वाद असतातच असतात आपण अश्या सार्वजनिक क्षेत्रात काम करताना हे मिटवायचे असते ते नावाकरिता नाही, मोठे पणा करिता नाही किंवा त्यांचे वाद चव्हाट्यावर, वृत्तपत्रातून जिल्हाभर आणण्याकरिता नाही तर नबी ए करीम स. अ. व सल्लम यांनी पाच अनिवार्य गोष्टीपेक्षा “सुलह” करणाऱ्याला महत्व दिले आहे.

माझ्या मुस्लिम बांधवानो एक कायदा लक्षात घ्या जे कब्रस्तान वक्फ बोर्डाकडे नोंदणी आहे व त्याची फक्त व ठराविक कुटुंबासाठी किंवा नमूद क्षेत्रासाठी म्हणून वासियत नाही तर त्या कब्रस्तानात भारतातील कोणताही मुसलमान दफनविला जाऊ शकतो यास कोणाला हि विरोध करता येत नाही.
आता सध्या या विषयावरून वृत्तपत्रातून झळाळून बातम्या येत आहेत पण आहे जे शासन आपल्याला चांगुलपणामुळे मदत करीत आहे व देह ताब्यात देत आहे ते जर नियमानुरूप बंद केले तर त्या देहास ना सरळ गुसुल मिळणार आहे ना धार्मिक विधी. यास जबाबदार कोण ?
आज आम्ही आमच्या अश्या अनेक कारणामुळे अडचणीत आणत आहोत, कार्य थांबत आहे हा गुनाह कोणावर? याचे पाप कोण फेडणार? तरी आजच्या रात्री आपण आपले आत्मपरीक्षण करूया, आज पर्यंत केलेल्या गुनाह ची माफी मागु या. अल्लाह गफुरूर रहीम आहे , इन्शा अल्लाह अल्लाह जरूर माफ करतील, आपण आपली वागणूक सुधारुया व एकत्रित काम करू या.

*दुआ कि दरखास्त*

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + 3 =