You are currently viewing एसटी कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्याच्या सूचना

एसटी कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्याच्या सूचना

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कोरोना टास्क फोर्स समिती बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. संजना सावंत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्याने लस उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.

जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, देवगड या राज्य परिवहन महामंडळ कडील डेपो मध्ये लस उपलब्ध करून देण्यात आली. एस टी डेपो मध्ये जाऊन आरोग्य यंत्रणेकडून एसटी कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले. या लसीकरणाचा शुभारंभ कुडाळ एसटी डेपो मधून सौ. संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रणजीत देसाई, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी संदेश कांबळे, डेपो मॅनेजर व आरोग्य व एसटी कर्मचारी उपस्थित होते.

एसटी विभागाचे कर्मचारी गाडीचे चालक व वाहक ह्या व्यक्ती नेहमी लोकांच्या संपर्कात येतात त्यामुळे त्यांना सुरक्षितता प्रदान करणे महत्वाची गरज असल्याचे ओळखून त्यांचे लसीकरण याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याचे अध्यक्ष संजना सावंत यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + two =